काँग्रेसने दिली औरंगाबादची ऑफर, अब्दुल सत्तार यांचा दावा

काँग्रेसने दिली औरंगाबादची ऑफर, अब्दुल सत्तार यांचा दावा

जर माझा नेताच पक्ष सोडण्याचा विचार करीत असेल तर मी वेगळा निर्णय घेतला तर काय चुकलं?

  • Share this:

औरंगाबाद 25 मार्च : काँग्रेसमधून राजीनामा दिलेले बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. अशोक चव्हाण हेत माझे नेते आहेत असंही ते म्हणाले. पुढे कुठली भूमिका घ्यायची याचा निर्णय 29 मार्चला जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसने उमेदवारी देण्याची ऑफर दिली असा खुलासाही त्यांनी केला. काँग्रेसने या ठिकाणी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे.

सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचं तिकीट हवं होतं. पण तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनाम दिला होता. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आधी काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवारही दोन वेळा बदलला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार

गेली दोन दिवस अशोक चव्हाणांची फोनवर चर्चा केली आहे. ते माझे नेते आहेत.

मी २९ तारखेला सभा घेणार, त्यात माझे कार्यकर्ते जर म्हणाले तर पुढचे पाऊल टाकणार आहे. आज नगरला जाऊन विखे पाटील यांचीही भेट घेणार आहे.

मी पक्षाकडे औरंगाबादची जागा मागितली होती, अशोक चव्हाण यांना सांगितले होते. जिल्हाध्यक्ष असल्यानं सर्वांची नावे दिल्लीला पाठवली होती.

नांदेडला एक गोपनीय बैठक झाली, त्यादिवशी मी अशोक चव्हाण यांना विनंती केली. मी सांगितलेल्या नावाचा विचार करा, अन्यथा मी जबाबदारी घेणार नाही, असे सांगितले होते.

विकास कामात मुख्यमंत्री यांनी मदत केल्याने मी आभार मानण्यासाठी गेलो होतो

जर माझा नेताच पक्ष सोडण्याचा विचार करीत असेल तर मी वेगळा निर्णय घेतला तर काय चुकलं?

First published: March 25, 2019, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading