काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे समोर, सर्वांना धक्का देत 'इतक्या' जागा जिंकण्याचा केला दावा

काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे समोर, सर्वांना धक्का देत 'इतक्या' जागा जिंकण्याचा केला दावा

निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच स्तरातून निकालाबाबतचे अंदाज बांधले जात आहेत.

  • Share this:

अभिषेक पांडे, मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच स्तरातून निकालाबाबतचे अंदाज बांधले जात आहेत. मतदान संपताच काही संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले होते. या सर्वच एक्झिट पोल्समधून भाजप आणि शिवसेनेला मोठा विजय मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता काँग्रेसचाही एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे.

काँग्रेसच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसने 89 जागांवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेसला 50 ते 35 जागा मिळतील, असं काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची माहिती आहे. खरोखरंच इतक्या जागा मिळाल्या तर सतत मानहानीकारक पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या काँग्रेससाठी हा दिलासा असणार आहे.

'विलासरावांचे दोन्ही सुपुत्र जिंकणार!'

दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र निवडणुकीच्या मैदानात आहेत. अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख आपले नशीब आजमावत आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून देशमुख बंधूंसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याची चर्चा आहे. मात्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही या निवडणुकीत विजय होतील, असं काँग्रेसच्या सर्व्हेत म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला धोबीपछाड देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या