'शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का?'

'शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का?'

'छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेली अवमानना काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही.'

  • Share this:

मुंबई, दि. 3 जानेवारी : 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूस्त्रीदाक्षिण्य या सद्गुणाला राष्ट्रघातक, कुपात्री, व विकृत्ती असे संबोधून महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपाला मान्य आहेत का?' असा सवाल करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेली अवमानना काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही, असंही सचिन सावंत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. सावरकरांबद्दल भाजपला आलेला कळवळा ही महाराष्ट्रात भाजपाविरहित सरकार स्थापना झाल्याच्या पोटशूळातून तसेच राजकीय कावेबाजीतून आलेला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे.

भाजपच्या गोटातून मोठी बातमी, खडसेंसह पंकजा मुंडेही होणार आमदार

'मध्य प्रदेश मधील सेवादलाच्या एका घटकाने मर्यादित स्वरुपात वाटप केलेल्या माहिती पुस्तिकेतील काही मजकूराचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निश्चितच समर्थन करत नाही. काँग्रेस पक्षाचा सावरकरांच्या विचारांना असलेला विरोध हा वैचारिक असून तो व्यक्तिव्देषातून नक्कीच नाही. सावरकरांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दलची माहिती ही अप्रस्तुत असून ती फ्रीडम अॅट मिडनाईट एका पुस्तकाच्या आधारे ती केलेली आहे. असे असले तरी कोणाचे व्यक्तिगत आयुष्य हे राजकीय चर्चेचा भाग असू नये हीच काँग्रेस पक्षाची धारणा आहे. वैयक्तिक चारित्र्यहनन हा संघाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे काँग्रेसच्या नव्हे,' असा टोला लगावत सचिन सावंत यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

'गांधीजींच्या बदनामीला भाजपचे समर्थन'

'मध्य प्रदेशात वाटल्या गेलेल्या माहितीपुस्तकाबद्दल अकांडतांडव करणाऱ्या भाजपाला आलेला सावरकरांबद्दलचा कळवळा हा राजकीय कावेबाजीतूनच आलेला आहे. याच माहिती पुस्तकात नमूद केलेल्या गायीबद्वलच्या व इतर सावरकरांच्या विचारांना भाजपाची व संघाची मान्यता नाही. अनेक वर्षे सावरकरांना संघ परिवाराने दूर ठेवले होते. अचानक सावरकरांबद्दल आलेले प्रेम हे महाराष्ट्रातील भाजपविरहित सरकार अस्थिर करण्यासाठी आहे. दुर्दैवाने महात्मा गांधींची शरद पोंक्षे सारखे व्यक्ती जाहीर बदनामी करत असताना त्याच व्यासपीठावर बसलेले भाजपा नेते गप्प बसून समर्थन देत असतात,' असा आरोप काँग्रेसने केला आहे.

शिवाजी महाराज आणि सावरकर, काँग्रेसचा गंभीर आरोप

'छत्रपती संभाजी महाराज यांना सावरकर आणि गोळवलकर या दोघांनीही मदिरा व मदिराक्षींसी आसक्ती असलेला नाकर्ता पुरुष असे म्हटलेले हे भाजपाला मान्य असेल परंतु काँग्रेस त्याचा निकराने विरोध करते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू द्वेषाने डोकं फिरलेला म्हणणे भाजपाला मान्य असेल काँग्रेसला नाही. बौध्द धर्मीयांनी स्वराष्ट्रद्रोह करण्यास मागेपुढे पाहिले नाही असे म्हणणे असेल वा त्यांची राष्ट्रद्रोही प्रवृत्ती होती व बौद्ध संघ म्हणजे उपजत राष्ट्रद्रोह्यांचा संघ असे सावरकरांचे मत भाजपाला मान्य असेल,' आम्हाला नाही असंही सचिन सावंत म्हणाले.

First published: January 4, 2020, 7:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading