चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांना धक्का, काँग्रेसने केला भाजप उमेदवाराचा पराभव

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांना धक्का, काँग्रेसने केला भाजप उमेदवाराचा पराभव

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 24 जून- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे.

वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदासंघात लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठा धक्का बसला होता.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा पराभव..

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडासाफ झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मात्र, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून धानोरकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार असतील.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार असताना हंसराज अहीर विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट तथा या लोकसभा क्षेत्रात भाजपचे पाच आमदार असताना ४५ हजार मतांनी झालेला पराभव अनपेक्षित, चिंतनीय व धक्कादायक असल्याचे अहिर यांनी म्हटले होते. या पराभवाचे राष्ट्रीय पातळीवर निश्चितच चिंतन होईल. या पराभवाने खचून न जाता पक्ष कार्य अधिक जोमाने करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभा निकालानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत दिली.

दरम्यान, हंसराज अहीर हे भाजपमध्ये 1980 पासून सक्रिय आहेत. भाजयुमो अध्यक्ष ते स्वीकृत नगरसेवक, विधान परिषद आमदार, खासदार त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे भूषवले आहेत.

VIDEO: 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

First published: June 24, 2019, 11:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading