Home /News /maharashtra /

प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार? काँग्रेसच्याच नगरसेवकाचा विरोध

प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार? काँग्रेसच्याच नगरसेवकाचा विरोध

सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या नगरसेवकानेच प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय.

    सागर सुरवसे, सोलापूर 28 जुलै : सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झालीय. शहर मध्यमधून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकाने केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभेतील सलग दुसऱ्या पराभवानंतर आता प्रणिती शिंदे यांच्यासाठीही मतदारसंघात हा धोक्याचा इशारा समजला जातो. कारण शिंदेंचे कट्टर समर्थक असलेल्या एका नगरसेवकाने शहर मध्य विधानसभेची उमेदवारी मुस्लिम समाजाला देण्याची मागणी केलीय. मात्र ही मागणी केलीय की करायला लावलीय याबाबत शंका उपस्थित करण्यात येतेय. रायगड आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई आणि ठाण्यालाही धोका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावं लागलंय. त्यामुळे ऐकेकाळी असलेला शिंदे यांचा प्रभाव आता संपला असं बोललं जाऊ लागलं. त्यानंतर आता त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीलाच विरोध होतोय. काँग्रेसचे नगरसेवक यु. एन. बेरिया यांनीच त्यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. बेरिया हे सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा तर दुसरीकडे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या मोची समाजानेही बैठक घेऊन उमेदवारी मोची समाजाला मिळावी अशी मागणी केलीय. त्यामुळे प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळवताना मोठे अडथळे पार करावे लागणार आहेत. माकपचे ताकदवर नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांना धूळ चारत शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदेंनी दोन वेळा नेतृत्त्व केलं होतं. या मतदारसंघात मुस्लिम आणि मोची समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ झालीय. मात्र असं असलं तरी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांची भेट घेऊन त्यांनी घेतलेली अजित पवारांची भेट चर्चेचा विषय झालीय. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, नाहीतर 288 जागा जाहीर करणार कारण मध्ये सोलापूरमध्ये येत असलेला मोहोळ हा मतदारसंघ राखीव असून तो राष्ट्रवादीकडे आहे. तसेच तो मतदारसंघ सुरक्षीत असल्याने त्याठिकाणाहूनही प्रणिती शिंदे उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा आहे.
    First published:

    Tags: Praniti shinde, Sushilkumar shinde

    पुढील बातम्या