निलेश पवार, प्रतिनिधी
नंदूरबार, 12 जून : नंदुरबारमधल्या काँग्रेस नगरसेवकाने मुलाच्या लग्नानिमित्ताने दिलेली जंगी पार्टी चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून या पार्टीतील खानसमाच कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. या स्नेहभोजन प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नंदुरबारमधील नगरसेवक परवेझ खान यांनी झराळी येथील फार्म हाऊसवर मागील रविवारी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, संचारबंदी असताना देखील या नेत्याच्या पार्टीला 300 हुन अधिक पुढारी, अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा - पुतण्याने भर रस्त्यात केला काकाचा खून; सोलापूर शहरातील घटनेनं खळबळ
दुसरीकडे, या नेत्याच्या पार्टीच्या आयोजनानंतर भाजपाला आयते कोलीत हाती लागल असून जिल्हा भाजपाने या पार्टी आयोजन प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. तर संबंधित नगरसेवकाने हा कार्यक्रम परवानगी घेऊन केल्याचे पत्रक काढत यात पन्नासहुन कमी लोकांनी हजेरी लावल्याचा दावा करत सदर कोरोनाबाधित आढळलेली व्यक्ती या पार्टीचे खानसमा नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, झराळी येथील फार्महाऊस वर रविवारी झालेल्या स्नेहभोजनामध्ये पन्नासहुन अधिक लोकं सामील झाल्याचे प्रशानाच्या चौकशीत आढळून आले होते. हे सारे प्रकरण बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रांतअधिकारी, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांची चौकशी समिती गठीत केली होती. या नंतर आज तहसिलदार नंदुरबार यांनी स्वत: तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -या मोठ्या राज्यात लपवले 200 कोरोना रुग्णांचे मृत्यू, माहिती उघड झाल्याने खळबळ!
मात्र, काँग्रेस नगरसेवकाने कोरोनाबाधित खानसमा नसून आपला नातेवाईक असल्याचे दावा केला. पण, परवेझ खान यांच्यावर 188, 268, 269 ,290 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 54 व साथरोग अधिनियम 1897 ते कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.