सांगली, 23 नोव्हेंबर : काँग्रेसच्या (Congress) शहर जिल्हाध्यक्षांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतोय. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विजयी उमेदवार पृथ्वीराज पाटील (Pruthviraj Patil) यांनी भाजपचे नेते आणि विजयी उमेदवार सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh) यांना कडकडून मिठी मारत शुभेच्छा दिल्या आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Sangli district bank election results) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सत्ता आली आहे. मात्र काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत (MLA Vikram Sawant) यांचा पराभव झालाय. भाजपचे (BJP) प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. त्यामुळे सत्ता आली असली तरी 'गड आला पण सिंह गेला', अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.
एकीकडे काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झालाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष चक्क भाजपच्या उमेदवाराला मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे सांगलीकारांच्या भाषेत आमदारांचा करेक्ट कार्यक्रम झालाय की काय? अशी कुजबूज सांगलीत सध्या सुरु आहे.
हेही वाचा : धरणात पाणी नाही तर मुतू का? म्हणणाऱ्याला डोकं नसेल, पण... : ओवेसी
निवडणूक बिनविरोध न केल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला असून भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. आमदार विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत. तर माजी सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजपाचे नेते सत्यजित देशमुख हे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे साख्खे साडू आहेत.
व्हिडीओ बघा :
सांगलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार सत्यजित देशमुख यांना कडकडून मिठी मारत दिल्या शुभेच्छा pic.twitter.com/sBgYKEHBsW
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2021
मिरज सोसायटी गट
विशाल दादा पाटील (आघाडी) 52 विजयी
उमेश पाटील (भाजप) 16
आटपाडी सोसायटी गट
तानाजी पाटील (आघाडी) 40 विजयी
राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) 29
कडेगांव सोसायटी गट
मोहनराव कदम (आघाडी) 53 विजयी
तुकाराम शिंदे (भाजप) 11
तासगाव सोसायटी गट
बी. एस. पाटील (आघाडी) 41 विजयी
सुनील जाधव (भाजप) 22
ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) 15
वाळवा सोसायटी गट
दिलीप तात्या पाटील (आघाडी) 108 विजयी
भानुदास मोटे (भाजप) 23
कवठेमंकाळ सोसायटी गट
अजितराव घोरपडे (आघाडी) 54 विजयी
विठ्ठल पाटील (अपक्ष) 14
जत सोसायटी गट
प्रकाश जमदाडे (भाजप) 45 विजयी
विक्रमसिंह सावंत (आघाडी) 38
महिला राखीव गट
अ जयश्रीताई पाटील (आघाडी) 1688 विजयी
ब अनिता सगरे (आघाडी) 1408 विजयी
संगीता खोत (भाजप) 579
दिपाली पाटील (भाजप) 405
अनुसूचित जाती गटात
महाआघाडीचे विद्यमान संचालक
बाळासो होनमोरे 1503-548 मतानी विजयी.
भाजपचे रमेश साबळे पराभूत.
ओबीसी गटात
महाविकासआघाडीचे मन्सूर खतीब 1395 मते मिळवून विजयी.
भाजपचे रवि तम्मणगौडा यांना 772 मते मिळाली.
विकास महाआघाडीचे चिमण डांगे विजयी
महाआघाडीचे वैभव शिंदे विजयी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.