सत्तासंघर्षात काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; ऐतिहासिक आघाडीचं राज्य येणार

सत्तासंघर्षात काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; ऐतिहासिक आघाडीचं राज्य येणार

महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्रात राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर आता शिवसेना सत्तेचा दावा करणार आहे. दिल्लीतूनही शिवसेनेसाठी खूशखबर आली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यातून प्रत्यक्ष सरकारमध्ये केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचा राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर आता अखेर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे राजभवन इथं जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

'बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे भाजपला धडा शिकवणार'

महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसचा विचार सुरु आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले आहे. तर दिल्लीतील सूत्रांकडून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नको याबाबत काँग्रेस पेचात सापडली असताना त्यांच्या मदतीला माजी पंतप्रधान आले आहेत.

जर काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असेल तर त्यांनी राज्य सरकार पुढील पाच वर्षासाठी स्थिर राहील याची हमी द्यावी. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील, असा सल्ला माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांनी दिला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात स्थान दिले. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी स्वत: बाळासाहेबांकडे केले होते. त्यांनी बाळासाहेबांकडे जागेची मागणी केली होती. आता भाजपने मर्यादा ओलांडली आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आता भूमिका घेतली आहे आणि ते भाजपला धडा शिकवतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपला खाली खेचण्याची संधी आहे, असे देवेगौडा म्हणाले.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या