अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी मुंबई, 15 एप्रिल : काँग्रेसचे लोकसभेसाठी उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारादरम्यान निवडणुकीपूर्वीच जल्लोश साजरा करण्यात आला आहे. आज प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्यावर पुष्पवर्षाव केला. वर्सोव्यातील प्रचारादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.