'काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी वाचवता येणार नाही'

'काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी वाचवता येणार नाही'

आता काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन जरी दिले तरी त्याला जिवंत करता येणार नाही.

  • Share this:

पुणे, 07 ऑक्टोबर: काँग्रेस (Congress) पक्षाचा पूर्ण नायनाट झाला असून आता त्याला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी वाचवता येणार नाही, अशा शब्दात एमआयएम(AIMIM)चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर टोला लगावला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. यासाठी पक्षाच्या पहिल्या सभेत पुणे येथे ते बोलत होते.

देशाच्या राजकीय नकाशावरून काँग्रेस पक्षाचा नायनाट झाला आहे. आता काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन जरी दिले तरी त्याला जिवंत करता येणार नाही, असे ओवैसी म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना बाजूला केल्याचा आरोप त्यांनी केला. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत AIMIM आणि प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन महासंघ तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. या आघाडीला एक जागा मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत मात्र AIMIM आणि वंचित आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. गेल्या म्हणजेच 2014च्या विधानसभा निवडणुकी AIMIMने दोन जागांवर विजय मिळवत सर्वांना धक्का दिला होता.

त्याआधी औरंगाबाद येथे बोलताना ओवैसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. गोडसेने गांधींची हत्या केली होती. पण सध्याचा गोडसे गांधींच्या भारताला संपवत आहे. जे गांधीजींना मानतात त्यांना मी विनंती करेन की या देशाला वाचवा, असे ओवैसी म्हणाले होते.

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

सेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद की उपमुख्यमंत्रिपद येणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

First published: October 7, 2019, 8:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading