मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जेबी नगर वार्डात मागच्या वेळी काँग्रेस फक्त 48मतांनी विजयी, यावेळी कुणाची जादू चालणार?

BMC Election 2022 : जेबी नगर वार्डात मागच्या वेळी काँग्रेस फक्त 48मतांनी विजयी, यावेळी कुणाची जादू चालणार?

भाजप यावेळी आणखी पूर्ण तयारीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाची लोकसंख्या 45 हजार 321 इतकी आहे.

भाजप यावेळी आणखी पूर्ण तयारीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाची लोकसंख्या 45 हजार 321 इतकी आहे.

भाजप यावेळी आणखी पूर्ण तयारीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाची लोकसंख्या 45 हजार 321 इतकी आहे.

    मुंबई, 25 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने मुंबईतील प्रत्येक वार्डनिहाय आढावा घेतला.  जाणून घ्या, वॉर्ड क्रमांक 82 गुंदवली बद्दल... गुंदवली वार्ड क्रमांक 82 बद्दल (Gundwali Ward No. 82) बोलायचं झालं तर याठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे जगदीश अमीन कुट्टी (Jagdish Kutti Congress) हे याठिकाणांहून नगरसेवक झाले आहेत. या वार्ड क्रमांक 82मध्ये जे. बी. नगर, अशोक नगर, रामलिला मैदान, तेली गल्ली परिसर, गुंदवली, विमा नगर, साई नगर आणि एएआय कॉलनी या भागाचा समावेश आहे. फक्त 48 मतांनी विजय... 2017चा विचार केला तर काँग्रेसने याठिकाणी बाजी मारली होती. मात्र, निवडून आलेले जगदीश कुट्टी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्यांनी फक्त 48 मतांनी विजय मिळवला होता. भाजप उमदेवार संतोष केळकर यांना या निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे भाजप यावेळी आणखी पूर्ण तयारीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाची लोकसंख्या 45 हजार 321 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 753 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 341 आहे. या निवडणुकीत 19 हजार 317 मतदारांनी भाग घेतला होता. काँग्रेसची बाजी -  2017मध्ये काँग्रेसचे विजयी उमदेवार जगदीश कुट्टी अण्णा यांना 5663मते मिळाली होती. तर पराभूत भाजप उमेदवार संतोष केळकर यांना 5615मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. शिवसेना उमदेवार आणि माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या निवडणुकीत याठिकाणी एकूण 15 उमेदवार उभे होते. त्यात काँग्रेसने बाजी मारली. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 82 मध्ये यावेळी काँग्रेस उमेदवार जगदीश अमीन कुट्टी अण्णा यांना पक्षाने निवडणूक लढवायची संधी दिली आणि ते निवडून आले तर ते दुसऱ्यांदा नगरसेवक होतील. त्यांनी मागच्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. लोकांशी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यामुळे ते पुन्हा या निवडणुकीत जिंकून येण्याची शक्यता आहे. वार्ड क्रमांक 82मध्ये नगरसेवक पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या