मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : धारावी बस डेपो वार्ड यावेळी खुला झाल्यानं समीकरणं बदलली; यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : धारावी बस डेपो वार्ड यावेळी खुला झाल्यानं समीकरणं बदलली; यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 183 यामध्ये धारावी बस डेपो, सायन वांद्रे लिंक रोड, नाईक नगर, नेचर पार्क हा परिसर येतो.

वार्ड क्रमांक 183 यामध्ये धारावी बस डेपो, सायन वांद्रे लिंक रोड, नाईक नगर, नेचर पार्क हा परिसर येतो.

वार्ड क्रमांक 183 यामध्ये धारावी बस डेपो, सायन वांद्रे लिंक रोड, नाईक नगर, नेचर पार्क हा परिसर येतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 23 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्र. 183 बद्दल (Ward no. 183) बोलायचे झाले तर याठिकाणी मतदारांनी काँग्रेसच्या (Congress) झोळीत यश टाकले होते. काँग्रेस उमेदवार गंगा कुणाल माने याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 183 बद्दल. वार्डची सीमा - वार्ड क्रमांक 183 यामध्ये धारावी बस डेपो, सायन वांद्रे लिंक रोड, नाईक नगर, नेचर पार्क हा परिसर येतो. तसेच या वार्डची सीमा ही पश्चिम रेल्वे मार्ग आणि मुंबई शहराच्या उत्तर सीमांच्या जंक्शनपासून सुरू होऊन, मुंबई शहराच्या उत्तर सीमांच्या बाजूने पूर्वेकडे, लालबहादूर शास्त्री मार्ग ओलांडून मध्य रेल्वे लाईन्सच्या जंक्शनपर्यंत, मध्य रेल्वे लाईन्सने दक्षिणेकडे सायन फ्लायओव्हर ब्रिज येथील संत रोहिदास मार्ग (धारावी रोड) पर्यंत; संत रोहिदास मार्ग आणि मुत्तुराम लिंगम तेवार मार्ग (माहीम – सायन लिंक रोड) च्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पश्चिम रेल्वे लाईनसात माहीमपर्यंत; पश्चिम रेल्वे मार्गाने उत्तरेकडे मुंबई शहराच्या उत्तरेकडील सीमांपर्यंत आहे. 2017च्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हाची एकूण लोकसंख्या 49050 इतकी होती. ज्यात अनुसूचित जाती 8806 आणि अनुसूचित जमातीचे 524 नागरिक होते. तर एकूण मतदार 27160 झाले होते. हेही वाचा - ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी
  • 2017च्या निवडणुकीतील वार्ड क्र. 183मधील उमेदवार, पक्ष आणि मते पुढीलप्रमाणे -
  1. भाग्यश्री श्रीकृष्ण वेंगुर्लेकर, भाजप - 2303
  2.  धायगुडे उत्कर्षा लाला, बसपा - 2942
  3. अन्सारी झैबुननिसा साजिद, अपक्ष - 137
  4. कटके उर्मिला राहुल, शिवसेना - 3859
  5. माने गंगा कुणाल, काँग्रेस - 3896
  6. हिना मौला शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 718 तसेच त्यावेळी नोटाला 208 मते पडली होती. तर 2 मते बाद झाली होती.
नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2017मध्ये मनपाची जी निवडणूक झाली त्यावेळी हा वॉर्ड महिला ओबीसीसाठी आरक्षित होता. आता मात्र, यात बदल झाला आहे. हा वार्ड आता खुला झाला आहे. त्यामुळे 2017च्या तुलनेत या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेस नगरसेविका गंगा कुणाल माने यांना या वार्डातून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे किंवा त्यांनी दुसरा वार्ड शोधावा लागेल. त्यामुळे वार्ड क्रमांक 183 धारावी डेपोची जनता आता कुणाच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालते हे आगामी काळात निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या