रणशिंग फुंकलं, काँग्रेसचे 57 उमेदवार ठरले; 8 संभाव्य उमेदवारांची यादी समोर

काँग्रेसने निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास सुरुवात केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 11:22 AM IST

रणशिंग फुंकलं, काँग्रेसचे 57 उमेदवार ठरले; 8 संभाव्य उमेदवारांची यादी समोर

मुंबई, 7 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यातही काँग्रेसची मोठी धूळधाण उडाली. आता महाराष्ट्र विधानसभेतही यश खेचून आणण्यासाठी काँग्रेसला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या छाननी समिती नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एकूण 57 उमेदवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

काँग्रेसने या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर लवकरच काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार ठरवण्यात आघाडी घेतल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातही काँग्रेसला यश मिळणार का, हे पाहावं लागेल.

राष्ट्रवादीचेही 7 उमेदवार ठरले

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली. कोणत्या मतदारसंघात आपली शक्तीस्थानं काय आहेत आणि काय नकारात्मक बाजू आहेत, याबाबतही खलबतं झाली. तसंच विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसंच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

VIDEO : पुतण्याबद्दल अखेर सुनील तटकरेंनी केलं मान्य, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...