निवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला?

निवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला?

संजय काकडे हे सध्या भाजपचे सहयोगी खासदार आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाला अडचणीत आणणारी विधानं करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष काही उमेदवार आयात करण्याची शक्यता आहे. पुणे, रत्नागिरी, उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघात नवीन उमेदवार देण्यासाठी काँग्रेसकडून जोरदारी हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

काही काळापूर्वी काँग्रेस सोडून गेलेले कोकणातील ताकदवान नेते नारायण राणे यांना काँग्रेस पुन्हा एकदा जवळ करण्याची शक्यता आहे. रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी राणे यांना संपर्क करण्यासाठी एका मोठ्या काँग्रेस नेत्याने मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुण्यातून संजय काकडे?

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून संजय काकडे यांच्या नावाचा विचार चालल्याची माहिती आहे. संजय काकडे हे सध्या भाजपचे सहयोगी खासदार आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाला अडचणीत आणणारी विधानं करत आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी सध्या भाजपची सलगी साधलेली आहे. भाजपच्याच कोट्यातून त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली आहे. पण भाजपची शिवसेनेबरोबर युती होऊ शकते. अशावेळी भाजप राणेंचा पत्ता कट करण्याची शक्यात आहे. त्यामुळे राणेंना काँग्रेस आघाडीच्या कोट्यातील रत्नागिरी लोकसभा जागा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

VIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली!

First published: January 19, 2019, 8:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading