आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस वापरणार 'ट्रम्प कार्ड', या नेत्याला उतरवणार मैदानात

आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस वापरणार 'ट्रम्प कार्ड', या नेत्याला उतरवणार मैदानात

निवडणुकीच्या एण्ट्रीवेळीच आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण निवडणुकीच्या एण्ट्रीवेळीच आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस तगडा उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे. आदित्य यांच्याविरोधात डॉ. सुरेश माने यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्याची शक्यता आहे. बसपा अध्यक्षा मायावती यांचे साथीदार डॉ. सुरेश माने यांनी बीआरएसपी हा पक्ष स्थापन केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत हा पक्ष काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहिती आहे.

आदित्य ठाकरे रणांगणात

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. यादरम्यानच आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचंदेखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा पुर्नउच्चार शुक्रवारी (30 ऑगस्ट) वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला होता.

'आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं', अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. गटप्रमुखांच्या या मागणीवर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब केलं होतं. पुढे ते असंही म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत'.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा 'ए' प्लस मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे, असं मत अनिल परब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी वरळीतील शिवसैनिकांना दिला. यापूर्वी युवासेनेने आदित्य यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी देखील आपली इच्छा बोलून दाखवली.

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

Published by: Akshay Shitole
First published: September 18, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या