अशोक चव्हाणांनी 'लेकी'चा व्हिडिओ केला पोस्ट, पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

अशोक चव्हाणांनी 'लेकी'चा व्हिडिओ केला पोस्ट, पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

'मोबाईलवर हा व्हिडिओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय'

  • Share this:

नांदेड, 07 जानेवारी :  नेत्यांच्या फेसबुक अकाउंटवर केवळ राजकीय घडामोडी संदर्भात पोस्ट टाकल्या जातात. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेअर केलेली ही भावनिक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक भावस्पर्शी टिकटॉक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडिओमध्ये लेकीचे आणि वडिलांच्या नात्याची हळवे दृश्य पाहण्यास मिळत आहे. एक वडील आपल्या चिमुकलीच्या पदस्पपर्शाने नवीन चारचाकी गाड़ीची पूजा करत असतानाचा हा भावनिक व्हिडिओ आहे.

'मोबाईलवर हा व्हिडिओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल', असं कॅप्शन या व्हिडिओला चव्हाणांनी दिलं आहे.

ही पोस्ट शेअर करुन अशोक चव्हाण यांनी आपल्या मुलींशी असलेल्या प्रेमाचीही प्रचिती दिली.

वेडेपणाचा कहर! चहासोबत तरुणीनं खाल्लं चिकन, VIDEO VIRAL

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने चहामध्ये इडली बुडवून खाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी त्या व्हिडिओवर बरीच टीका केली होती. इडली-सांबार भारतात खूपच पसंत आहे. आता तर एका मुलीने तंदुरी चिकन चहामध्ये बुडवून खाल्ले. ते पाहिल्यानंतर लोक खूप संतापले आहेत.

Hey, Guys! When I posted the tea & idli video, u/wromit suggested that I should try "tandoori leg" with tea. I couldn't find a leg piece, but I found what they call "Tikka." At first, I wasn't too sure about it, but after I tried it, I'm really digging the flavor. The after-taste was decent. from r/india

एका रेडिट युझरने व्हिडिओ अपलोड करत, "मित्रांनो, मी जेव्हा चहा आणि इडलीचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा तुम्ही लोक म्हणाले की आपण चिकनता लेग पीस आणि चह खाऊन बघा. त्यामुळं मी तुमच्यासाठी तंदुरी चिकन आणि चहा खाऊन बघत आहे. मला हे अजब कॉम्बिनेशन आवडले”, असे लिहिले आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की ती मुलगी कपमध्ये तंदुरी चिकन टिक्का टाकून त्यावर चहाही टाकते. मग ती एक चमचा घेते आणि तंदुरी टिक्का खातो. काही लोकांना हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही, एका युझरने, "तु काय केले? कृपया जगावर दया करा आणि लोकांना जगू द्या", असे कॅप्शन दिले आहे.

Tags:
First Published: Jan 7, 2020 08:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading