अशोक चव्हाणांनी बापलेकीचा शेअर केलेल्या व्हिडिओचा लागला शोध, फोन करून केलं कौतुक

अशोक चव्हाणांनी बापलेकीचा शेअर केलेल्या व्हिडिओचा लागला शोध, फोन करून केलं कौतुक

अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्या पित्याला लावला.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक पेजवर बापलेकीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. अखेर हा व्हिडिओ कुठला होता याचा शोध लागला आहे. खुद्द अशोक चव्हाण यांनी मंत्रालयात पोहोचल्यानंतर पित्याला फोन करून कौतुक केलं.

अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्या पित्याला लावला.

अशोक चव्हाण यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आलेला टिकटॉकचा हा व्हिडिओ ट्वीट आणि फेसबुकवर शेअर केला होता. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्वीटर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या.

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, मोबाईलवर हा व्हिडिओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल!

कोल्हापूरच्या नागेश पाटील यांनी तयार केला व्हिडिओ

अशोक चव्हाण यांची ट्वीटर आणि फेसबुकवरील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. हा टिकटॉक व्हिडिओ नागेश पाटील यांनी तयार केला.  मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी हा व्हिडिओ तयार केला होता. नागेश पाटील हे पुण्यातजवळ पिंपरी चिंचवडमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांची मुलगी निहारिका ही दोन वर्षांची आहे. त्यांच्या घरी मुलगी निहारिका जन्माला आल्यावर त्यांना आर्थिक फायदा झाला आणि त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर नवीन बोलेरो गाडी खरेदी केली. याच गाडीचे स्वागत त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या निहारिकाचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून ते पाय गाडीच्या बॉनेटवर ठेवून आपल्या नव्या गाडीची आगळीवेगळी पूजा केली. याचा हा व्हिडिओ  टिकटॉकवर अपलोड केला.

हाच व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी ट्वीट केला. रात्री उशिरा पाटील यांनी ट्वीटरवरून चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. अशोक चव्हाणांनी सकाळी तो ट्वीट पाहिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयात बसण्याचा आज त्यांचा पहिलाच दिवस होता. कार्यालयात पूजा करून स्थानापन्न झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिला फोन नागेश पाटील यांना लावला.

चव्हाण यांच्या ट्वीटला रात्री उशिरा उत्तर दिल्यानंतर सकाळीच त्यांचा फोन आल्याने ते देखील भारावून गेले होते. नागेश पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणात चव्हाण यांनी या व्हिडिओ मागील भावनेचं कौतुक केले. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि कोल्हापूर किंवा पुण्याला आल्यावर नक्की भेटू, असं आश्वासनही चव्हाण यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2020 06:30 PM IST

ताज्या बातम्या