मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, फोडली एकमेकांची डोकी!

काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, फोडली एकमेकांची डोकी!

 आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला.

आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला.

आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला.

भिवंडी, 15 जानेवारी : महाराष्ट्रात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी (gram panchayat election 2021)  मतदान सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी निवडणुकांना गालबोट लागले आहे. सत्ताधारी असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसचेच (Congress) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे.

भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. दोन गटात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे सुनील हरड, कैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला.  या घटनेत पाच जण जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मतदानावरून दोन गटांमध्ये एकमेकांना तुफान दगडफेक करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावात मतदानावरुन दोन गटात वाद झाला होता.  गावातील भोसले आणि भिंगारे गटात मतदान केंद्राच्याजवळ मतदानाच्या मुद्यावरून वाद उफाळला होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला होता. बाचाबाचीचे रुपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत  दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहे. जखमी कार्यकर्त्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले.  या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दौंडमध्ये कुसेगाव मतदान केंद्रावर राडा

दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. कुसेगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये अचानक वाद पेटला. तुफान हमरा-तुमरीचे रूपांतर भांडणात झाले आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन गटातील बाचाबाची थांबली.

मात्र, हा सगळा प्रकार मतदान केंद्राच्या आवारात झाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता. मात्र, याला कुठे तरी तडा गेल्याचे दिसून आले. सध्या कुसेगाव येथे सुरुळीत मतदान सुरू असले तरी भांडणानंतर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणावाचे वातावरण झाले होते. अद्याप या प्रकरणाचे कारण समजू शकले नाही.

First published:
top videos

    Tags: Bhiwandi, Congress, Gram panchayat, Shivsena, Solapur