नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता

नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता

राजू शेट्टी यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीशी जवळीक केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आता बदलताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता भाजप – शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना – भाजप युती झाल्यानंतर मित्र पक्षांची दखल न घेतल्यानं मित्र पक्षांमधील नाराजी दिसून आली. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मित्र पक्षांची नाराजी सेना - भाजपला परवडेल?

एनडीएवर नाराज असलेल्या राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी दोनच दिवसांपूर्वी निवडणुका लढण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे राज्यात चौथी आघाडी होणार का? अशी चर्चा रंगली होती. पण, आता राजू शेट्टी यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी जवळीक केली आहे.

LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार

शिवसेना – भाजप युती

शिवसेना - भाजप या दोघांमध्ये अखेर दिलजमाई झाली असून भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेसाठी देखील मित्रपक्षांना जागा देऊन उर्वरित जागांवर 50 – 50 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. पण, लोकसभेमध्ये मित्र पक्षांना डावललं गेल्याची भावना असून त्यांनी त्याबाबत आता नाराजी देखील व्यक्त केली आहे. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली असून त्यांनी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून 23 मे रोजी निवडणुकांचे निर्णय लागतील.

Special Report : प्रिया दत्त इज बॅक, पुनम महाजन यांना देणार टक्कर

First Published: Mar 14, 2019 07:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading