महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार?

राज्यात एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा रंगत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 10:06 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार?

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 3 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला जादुई आकडा गाठणं शक्य झालं नसलं तरीही भाजप आणि शिवसेना युतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं. मात्र युतीत सुरू असलेला छुपा संघर्ष निवडणूक निकालानंतर चव्हाट्यावर आला. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपली आहे. अशातच राज्यात एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा रंगत आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येईल. या सरकारला शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल,' असा खळबळजनक दावा शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे. शिवसेना नेत्याकडूनच असा दावा करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी?

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, हा शिवसेना नेत्याने केलेला दावा जर खरा ठरला तर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी नक्की कुणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं वृत्त शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं होतं. तसंच राष्ट्रवादीकडून पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी घेतली आहे पवारांची भेट

Loading...

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. तसंच त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळकीची चर्चा होत आहे.

राजकीय परिस्थितीबद्दल अजित पवार काय म्हणाले?

'राष्ट्रपती राजवटीची भाषा कोणी करत असेल तर तो प्रयत्न शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी होत असेल. पण असं काही होणार नाही. मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचा निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 10:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...