सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू

सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू

ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकील राष्ट्रवादीकडून छगन भुजबल, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक असे राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेसाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र कोणत्याही पक्ष अजूनही अंतिम निर्णयापर्यंत आलेला नाही. मात्र दिल्लीतील आजच्या बैठकीत काही ठोस भूमिका घेण्यात येण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज?

महाराष्ट्रातल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांच्या खेळीची कल्पना कुणालाच लागत नाही असं दिल्लीच्या वर्तुळात म्हटलं जातं त्यामुळे या भेटीकडे संशयाने पाहिलं जातंय. या आधीही पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. त्यामुळे पवार मोदी भेटीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या मोदी-पवार भेटीवर नाराज असल्याची माहिती काँग्रसमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चर्चेचा गाडा रुळावरून घसरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

संसदेतून बाहेर पडताना या भेटीवर जेव्हा सोनिया गांधी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फक्त नो कॉमेंट्स एवढचं उत्तर दिलं होतं. त्यावरूनही त्या नाराज असल्याचे संकेत मिळतात असं बोललं जातंय. पवारांनी पंतप्रधानांची 'चुकीच्या वेळेवर' भेट घेतली असं काँग्रेसला वाटतंय. या भेटीचा आणि नाराजीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

Tags:
First Published: Nov 20, 2019 05:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading