उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' 3 नेत्यांची नावं आघाडीवर

उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' 3 नेत्यांची नावं आघाडीवर

मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल, मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तास्थापनेचा गोंधळ आता शांत होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील बैठकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल, मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. तसंच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं तर राष्ट्रवादीतून अजित पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. दरम्यान, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार की हे पद पुन्हा शिवसेनेकडे राहणार, याबाबत अजून स्पष्टता नाही.

मुख्यमंत्रिपदाची विभागणी होणार?

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही वरिष्ठ नेत्यांकडून 'न्यूज18 लोकमत'ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाबाबत माहिती मिळाली आहे. आगामी मंत्रिमंडळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

जयंत पाटील

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

मकरंद पाटील

राजेश टोपे

या नेत्यांसह राष्ट्रवादीकडून आणखी काही नावांवर अद्याप विचार सुरू आहे.

काँग्रेसच्या संभाव्य नेत्यांची नावे

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवार

के सी पाडवी

विश्वजीत कदम

यशोमती ठाकूर

सतेज बंटी पाटील

सुनिल केदार

नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही एकूण 15 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आणखी काही नावांबाबत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 21, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading