उमेदवारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद? दोन जणांना उतरवलं मैदानात

उमेदवारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद? दोन जणांना उतरवलं मैदानात

काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

पंढरपूर, 3 ऑक्टोबर : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतर पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी केली. मात्र पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे आघाडीतील या दोन प्रमुख पक्षात समन्वयाचा अभाव आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसमधून आलेल्या भारत भालके यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं. पण त्यानंतर काँग्रेसनेही याच मतदारसंघातून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे. शिवाजीराव काळुंगे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भारत भालके यांनी काँग्रेसपासून वेगळं होत भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यानंतर भालके हे पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं. त्यानंतर आता काँग्रेसने त्यांच्यविरोधातच उमेदवार दिला आहे.

काँग्रेसची तिसरी यादी

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 20 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आतापर्यंत काँग्रेसने 120 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मध्य नागपूर मतदारसंघातून बंटी शेळके यांना तर पूर्व नागपूर मतदारसंघातून पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने दुसऱ्या यादीमध्ये एकूण 52 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लातूरमधून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी जाहीर झाली केली आहे.

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या