Live Updates : पटोले-दरेकर यांचा परस्परांना आंदोलनाचा इशारा, काँग्रेस-भाजप आमनेसामने येणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 13, 2022, 20:26 IST |
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:43 (IST)

  भुसावळ :

  पुरी गांधीधाम एक्सप्रेसमधून 2 अल्पवयीन मुला-मुलींकडून अडीच लाखांच्या गांजाची तस्करी 

  भुसावल लोहमार्ग पोलिसांनी दोन अल्पवयीन मुला-मुलींला ताब्यात घेत 20 किलो गांजा केला जप्त, तर एक आरोपी फरार

  नागपूर येथून पुरी-गांधीधाम एक्सप्रेसने गांजा तस्करी होणार असल्याची माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना मिळालेली, गोपनीय माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी केली कारवाई 

  अल्पवयीन मुला-मुलींकडून गांजा तस्करी करण्याचा प्रकार उघड, एक आरोपी फरार 

  फरार आरोपींचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध सुरु

  22:13 (IST)

  रायपूरच्या सराफा व्यावसायिकाच्या हिऱ्यांच्या अंगठ्या पळवणाऱ्याला ठोकल्या बेड्या, वर्धा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 47.82 लाखांचे दागिने केले हस्तगत

  21:31 (IST)

  फडणवीसांचा आघाडी सरकारवर निशाणा
  मविआ सरकार दिसत नसल्याची टीका
  'सरकार गेल्यापासून नैराश्यातून विधानं'
  आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर

  21:3 (IST)

  नाशिक :

  - वडिलांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार

  - उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

  - परिसरातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

  - आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

  19:55 (IST)

  LIC IPO चा डीआरएचपी सेबीकडे दाखल
  डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट सचिवांची माहिती
  LIC चा IPO लवकरच बाजारात येणार
  सरकार 5 टक्के समभाग विकणार
  65 ते 75 हजार कोटी रुपये उभे करणार

  19:52 (IST)

  एलआयसी आयपीओचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) आज सेबीकडे दाखल, डिपार्टमेंट आॅफ इन्व्हेस्टमेंट ॲंड पब्लिक असेट मॅनेजमेंटच्या सचिवांची माहिती
  एलआयसीचा आयपीओ आता लवकरच बाजार येणार, सरकार ५ टक्के समभाग विकून ६५ ते ७५ हजार कोटी रुपये उभे करणार 

  19:31 (IST)

  रत्नागिरी :
  खासदार सुनील तटकरे यांनी सावित्री नदीवरील पुलाची केली पाहणी
  म्हाप्रळ-आंबेत पुलाला धोका 
  अवजड वाहन बरोबरच लहान वाहनांचा देखील प्रवास बंद होणार 
  तात्पुरत्या दुरुस्तीकरिता दहा लाख रुपये मंजुर, 
  नवीन मुलांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे तटकरेंनी सांगितले

  19:22 (IST)

  अतुल लोंढेंचा प्रसाद लाडांवर प्रतिहल्ला, उद्या आम्ही येणारच, गांधींच्या अहिंसा मार्गानं आंदोलन करणार

  18:57 (IST)

  खासदार संभाजीराजे उद्या आंदोलनाची घोषणा करणार?

  मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे; याबाबत उद्या 14 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

  18:51 (IST)

  मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्या
  समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी चर्चा
  विचारविनिमय करून माझी पुढील दिशा ठरवलीय
  उद्या सकाळी 11 वा. मुंबईत पत्रकार परिषद
  संभाजीराजे छत्रपती उद्या भूमिका स्पष्ट करणार
  संभाजीराजे छत्रपती उद्या मोठा निर्णय घेणार?

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स