'तुम्ही एकनाथ खडसेंना अडवाणी केलं', मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

'तुम्ही एकनाथ खडसेंना अडवाणी केलं', मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांचा आक्रमकपणा पाहून हे सत्ताधारी आमदार आहेत की विरोधक, असा प्रश्न निर्माण झाला होता.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 19 जून : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज विधानसभेत स्वत:च्याच सरकारवर चांगलेच बरसले. एकनाथ खडसे यांचा आक्रमकपणा पाहून हे सत्ताधारी आमदार आहेत की विरोधक, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच आता खडसेंवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

'खडसे साहेबांचा तुम्ही लालकृष्ण आडवाणी केलंय. त्यांना किमान राज्यपाल तरी करा,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकंदरीतच एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीवरून काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अधिवेशनात विरोधकांपेक्षा जास्त आक्रमक दिसत आहेत. बुधवारी (19 जून) विधानसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार एकनाथ खडसे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना दिसले. सौर पंपांच्या विषयानंतर आता आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर खडसेंनी मंत्र्यांना धारेवर धरले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला. नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरांवर संताप व्यक्त करत खडसेंनी सरकारला लक्ष्य केले.

खडसेंनी आपली नाराजी अशी जाहीर व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना स्थान मिळालं नाही. सरकार तर नाहीच नाही तर पक्ष संघटनेतही खडसेंना बाजूला केले. याचीही सल खडसेंच्या मनात आहे. त्यामुळेच 'पक्ष वाढवण्यासाठी बाहेरचे लोक आयात करावे लागतात', असे उद्गार खडसे यांनी नुकतेच काढले होते.

शिवसेना आमदार-मुख्यमंत्री फडणवीस आमनेसामने, पाहा VIDEO

First published: June 19, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading