विधानसभेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, 'वंचित' बद्दल घेतला हा मोठा निर्णय

विधानसभेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, 'वंचित' बद्दल घेतला हा मोठा निर्णय

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. गेल्या काही दिवसात आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी सकारात्मक आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जून : विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. गेल्या काही दिवसात आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी सकारात्मक आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच याबद्दल माहिती दिली. विधानसभेसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करायची होती. पण वंचित बहुजन आघाडीकडून काही संकेत न आल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच एकत्रिरित्या निवडणूक लढवणार आहेत.

कार्यकर्त्यांचा आग्रह 'वंचित'साठी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढत दिली. पण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मदत केली नाही, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपलाच मदत केली,असाही या कार्यकर्त्यांचा आरोप होता.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसने युती करावी, असाही कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच आघाडी होणार, अशी चिन्हं आहेत.

विधानसभेसाठी वेगळी रणनीती

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. आमचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळेच झाला, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीतली स्थिती पाहिली तर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही वेगवेगळे लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या लढती चौरंगी झाल्या. या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेना - भाजप यांची युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी यांच्यात लढत होण्याची चिन्हं आहेत.

=============================================================================================

VIDEO: बछड्याचा वाद; खैरे विरुद्ध इम्तियाज जलील वादाची नवी ठिणगी

First published: June 8, 2019, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading