नारायण राणेंच्या टीकेवर काय म्हणाले काँग्रेस नेते ?

नारायण राणेंच्या टीकेवर काय म्हणाले काँग्रेस नेते ?

काँग्रेस पक्ष सोडताना नारायण राणेंनी केलेले आरोप काँग्रेस नेत्यांनी तात्काळ फेटाळून लावलेत. राणेंचे माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांना माझ्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सुभेच्छा आहेत, असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी म्हटलंय.

  • Share this:

नांदेड/नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : काँग्रेस पक्ष सोडताना नारायण राणेंनी केलेले आरोप काँग्रेस नेत्यांनी तात्काळ फेटाळून लावलेत. राणे कुटुंबियांच्या घरात एकाचवेळी 3 पदं देऊनही ते अन्याय झाला म्हणत असतील ते हास्यास्पद आहे. असा प्रतिटोला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी लगावलाय. तर राणेंचे माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांना माझ्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सुभेच्छा आहेत, असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी म्हटलंय. हुसेन दलवाईंनीही राणेंना शेवटपर्यंत काँग्रेस कळालीच नसल्याचं म्हटलंय.

राणेंच्या टीकेवर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया -

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्याचं दुपारीच कानावर पडलं पण, पक्ष सोडताना त्यांनी जी कारण दिलीत. त्यात काहीही तथ्य नाही, राणेंना माझ्या शुभेच्छा आहेत.

मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस

राणे कुटुंबात एकाचवेळी 3 लोकांना पदं दिली गेली, काँग्रेस पक्षात यापूर्वी असं कधीच घडलं नाही, पराभूत होऊन सुद्धा सलग तीन वेळा राणेंना तिकीट दिलं. आणि राणे ज्या काळात अन्याय झाला म्हणतात, तेव्हा माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारीही नव्हती. तसंच काँग्रेसने दिले त्यापेक्षा मोठी जबाबदारी दुसरा कोणता पक्ष देत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविषयी कोणाला तक्रार असेल तर संबंधितांशी नक्की चर्चा करू, असंही मोहन प्रकाश यांनी म्हटलंय.

हुसेन दलवाई, खासदार, काँग्रेस

नारायण राणेंना काँग्रेस समजलीच नाही, तशीही काँग्रेस समजायला कठीणच आहे. राणे गोळवलकरांची विचारसरणी स्वीकारणार का ? असा सवालही हुसेन दलवाई यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 07:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading