सुकाणू समितीच्या बैठकीत राजू शेट्टी-बच्चू कडूंच्या सहभागावरून गोंधळ

सुकाणू समितीच्या बैठकीत राजू शेट्टी-बच्चू कडूंच्या सहभागावरून गोंधळ

राजू शेट्टी सरकारमधे सहभागी असल्याने, बच्चू कडू आमदार असल्याने त्यांच्या व्यासपीठावर असण्याबाबत आक्षेप घेतला

  • Share this:

08 जून : शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या  सुकाणू समितीची  नाशिकमध्ये बैठकीत पार पडली खरी पण यात मोठा गोंधळ झाला.

या बैठकीत मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार सहभागी झाल्या होत्या. त्या  व्यासपीठावर गेल्या, कोणत्याही पक्षाची मी नाही पण मला 2 मिनिटं बोलू द्या म्हणाल्या. आणि त्यांनी राजू शेट्टी सरकारमधे सहभागी असल्याने, बच्चू कडू आमदार असल्याने त्यांच्या व्यासपीठावर असण्याबाबत आक्षेप घेतला. यामुळे काही काळ गोंधळ झाला. राजकीय व्यक्ती विरहीत हे आंदोलन आहे आणि ते तसंच राहावं अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

एवढंच नाहीतर शेतकरी मेळाव्याच्या व्यासपीठावर जाण्यापासून काँग्रेस नेत्यांनाही शेतकऱ्यांनी रोखलं. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना शेतकऱ्यांनी व्यासपिठावर जाण्यास मनाई केली.

First published: June 8, 2017, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading