Home /News /maharashtra /

मुंडे बहीण-भावाचा वाद, परळीतील नामांकित शिक्षण संस्थेवर आता प्रशासक

मुंडे बहीण-भावाचा वाद, परळीतील नामांकित शिक्षण संस्थेवर आता प्रशासक

मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे.

बीड, 15 जानेवारी : मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे जिल्ह्याचं लक्ष होतं. जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि प्रशासक नेमण्यासाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर करणार आहे. ही समिती एकदा चौकशी केल्यानंतर 15 जानेवारी नंतर पुन्हा चौकशी करणार आहेत. दरम्यान, मुंडे बहीण-भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. राजेभाऊ करपे, डॉ. फुलचंद सालामपुरे, डॉ. प्रतिभा अहिरे या तिघांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती जवाहर एज्युकेशन सोसायटीतील विविध वादांवर चौकशी करत आहे. यामध्ये वादामुळे गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण घडणे, संस्थेतील गैरव्यवस्थापन, अध्यापक नियुक्ती संदर्भातील वाद, अध्यापकांची पदोन्नती वाद अशा विविध वादांचा समावेश आहे. ('अशा प्रवृत्तींना आमच्या हद्दीत प्रवेश नाही', गुळुंब ग्रामपंचायतीचा 'स्टार प्रवाह'ला मोठा झटका) धनंजय आणि पंकजा यांच्यातील संघर्ष नेहमीचाच बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षाची किंवा वादाची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्यात याआधीदेखील अनेकदा संघर्ष बघायला मिळाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी तर दोन्ही भाऊ-बहीणीमध्ये प्रचंड टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. याशिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले आहेत. पण त्या मंचावरुनही ते एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसलेले आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या