कोकणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंता, अहवाल येण्यास लागत आहेत 4 दिवस

कोकणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंता, अहवाल येण्यास लागत आहेत 4 दिवस

नमुन्यांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असतील तर कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे हा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 23 मे : कोकणात कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत मर्यादीत असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 मे रोजी नव्याने आठ रुग्ण सापडल्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. 23 मे पर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 झाला असून यातल्या पाच रुग्णांना आधीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नव्याने आढळलेल्या आठ रुग्णांपैकी चार जण मुंबईतून एक ठाण्यातून , एक बोरिवलीतून तर दोन जण रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातून आलेले आहेत. आढळलेले रुग्ण मुंबईतून आल्यावर त्याना संस्थात्मक क्वारन्टइन करण्यात आलेले असल्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांचा संपर्क आलेला नाही . पण मुंबईतून आलेले यातले दोन रुग्ण कणकवली शहरातले असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यातली आणखी एक गंभीर बाब म्हणजे 23 मे ला पॉझिटिव्ह आढळलेल्या या आठ रुग्णांचे स्वॅब नमुने सिंधुदुर्ग रुग्णालयाने 19 मे ला कोल्हापूरला तपासणीसाठी पाठवले होते. जर पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असतील तर कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे हा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उभारणार स्वॅब टेस्ट लॅब

सिंधुदुर्गात सध्या तीन स्वॅब कलेक्षन सेंटर आहेत. या तीन स्वॅब कलेक्षन सेंटर मधून रोज किमान 50 स्वॅब घेतले जातात. ते कोल्हापूरला पाठवले जातात . तर रत्नागिरी जिल्ह्यातील स्वॅब मिरज मेडिकल कॉलेजला पाठवले जातात. या दोन्ही ठिकाणाहून अहवाल यायला बराच विलंब होत आहे. ही समस्या लक्षात घेता कोकणात स्वतंत्र कोरोना स्वॅब टेस्ट लॅब असावी अशी मागणी खासदार विनायक राऊत आणि मंत्री शिवसेना आमदार उदय सामंत यानी मुख्यमंत्र्यांकडे केली होती . त्याचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अशी लॅब उभारण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून राज्य सरकारने एक कोटी सात लाख रुपये मंजूर केल्याची माहिती खासदार विनायक राऊत यानी दिली आहे .

या लॅबसाठी आणावी लागणारी यंत्रसामुग्री तज्ञ डॉक्टरांची नेमणूक यासाठी लागणारा कालावधी पाहता ती प्रत्यक्ष कार्यान्वीत होण्यास विलंब होणार आहे. म्हणूनच कोकणात आलेल्या मुंबईकरांचे प्रमाण पाहता पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांचे अहवाल किमान 24 तासात मिळावेत, अशी मागणी आरोग्य विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी केली आहे.

First published: May 23, 2020, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading