कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

मराठी न्यूज वेबसाइटमध्ये न्यूज 18 लोकमतने मोठी भरारी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : देश विदेशातल्या घडामोडी वेगाने पोहचवणाऱ्या न्यूज 18 लोकमतने वाचकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. Network18 ने एप्रिल 2019 मध्ये युजर्सच्या संख्येत मोठी झेप घेतली आहे. कॉमस्कोरच्या रिपोर्टनुसार नेटवर्क 18 च्या सर्व वेबसाइटच्या एकूण युजर्सच्या संख्येत मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 33 टक्के वाढ झाली आहे. नेटवर्क 18 च्या युजर्सची संख्या 15.41 कोटींवर पोहचली आहे. यासह न्यूज 18 हिंदीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

न्यूज 18 हिंदीने लाइव हिंदुस्तान, भास्कर आणि नवभारत टाइम्सला मागे टाकलं. न्यूज 18 हिंदीच्या पुढे आज तक पहिल्या तर अमर उजाला दुसऱ्या स्थानावर आहेत. कॉमस्कोर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेबसाइट युजर्स, ब्रँड यांचे विश्लेषण करते.

एप्रिल महिन्यात प्रादेशिक भाषांमध्येही नेटवर्क 18 ने वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात मराठी न्यूज वेबसाइटमध्ये न्यूज 18 लोकमतने अल्पावधित मोठी भरारी घेतली आहे. एबीपी माझा, दिव्य मराठीला मागे टाकून न्यूज 18 लोकमत पुढे गेले आहे. मराठी न्यूज वेबसाइटमध्ये सध्या न्यूज 18 लोकमत चौथ्या स्थानावर आहे. काँमस्कोरच्या आकडेवारीनुसार नेटवर्क 18 च्या इतर प्रादेशिक वेबसाइट्सने चांगली कामगिरी केली आहे.

डेलीहंट, एनडीटीव्ही, एचटी मीडिया ग्रुपला मागे टाकून news18.com च्या युजर्सची संख्या 8.03 कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय तामिळ भाषेतील न्यूज वेबसाइट तामिळमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. गुजरातमध्ये न्यूज 18 गुजरातीने दिव्य भास्करला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहेत. न्यूज 18 बांगला आणि न्यूज 18 कन्नड प्रादेशिक भाषेत त्यांच्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचल्या आहेत.

नेटवर्क 18 च्या मार्केट शेअरमध्ये वाढ झाली आहे. 44 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये मार्केट शेअर 59 टक्क्यांवर पोहचले आहेत. याबाबतीत नेटवर्क 18 ने प्रतिस्पर्धी इंडिया टुडे ग्रुपला मागे टाकलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे मार्केट शेअर 51 टक्के आहेत. भारतीय भाषांमध्ये न्यूज 18 इंडियाने नवभारत टाइम्सच्या वेबसाइटला मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं आहे.

SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

First published: May 29, 2019, 2:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading