जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण करा नाहीतर निलंबन होईल, तुकाराम मुंढेंचा सज्जड दम

जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण करा नाहीतर निलंबन होईल, तुकाराम मुंढेंचा सज्जड दम

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची अचानक पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या कानाकोप-यापासुन ते थेट कार्यालयाच्या पत्र्यांवर चढुन आढावा घेतला.

  • Share this:

09 मे : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची अचानक पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या कानाकोप-यापासुन ते थेट कार्यालयाच्या पत्र्यांवर चढुन आढावा घेतला.

दरम्यान सांगितलेली काम तात्काळ पुर्ण न झाल्यास निलंबनासाठी तयार रहा असा सज्जड दम देखील आयुक्तांनी दिला आहे. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावरचा कारभार रामभरोसे आहे. त्यामुळे येणा-या काळात युद्धपातळीवर यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

अनेकदा जलशुद्धीकरण केंद्राच्या तात्रिक अडचणींकडे लक्ष द्यायला महापालिकेला वेळ नसतो. कधी कर्मचा-यांची कमी तर कधी जलशुद्धीकरणासाठी लागणा-या साहित्यांची बोंब यामुळे शहरात शक्य असुन देखिल 24 तास पाणीपुरवठा होवु शकत नाही. मात्र आयुक्तांच्या दणक्यानंतर अधिकारी कामाला लागणार का हे बघणं देखिल महत्वाचं ठरणार आहे.

 

First published: May 9, 2018, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading