नागपूर, 3 जुलै : नागपूरसह संपूर्ण राज्यात बोगस बियाण्यांसंदर्भांत राज्यभरातून 35 ते 40 हजार शेतकऱ्यांचा तक्रारी आल्या असून या सर्व तक्रारींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी वैज्ञानिक आणि कृषी विभागाची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी असून साधारणतः 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
महाबीज बियाणे संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे बदलवून देण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले .
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखाच्या आत कर्ज असणाऱ्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांपैकी 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले असून लॉकडाऊन मुळे 11 लाख शेतकऱ्यांना दिली जाणारी राज्य शासनाची कर्जमाफी अडली आहे. लॉकडाऊनची परिस्थिती सामान्य झाल्यास 11 लाख शेतकऱ्यांना तब्बल 8 ते 9 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, अशी माहितीही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर दिली.
वीज बिलासंदर्भात काय म्हणाले दादा भुसे?
शेतकऱ्यांचे मार्च ,एप्रिल, मे या तीन महिन्याचे किमान 300 वीज युनिट माफ करावे, अशी मागणी होत आहे. या प्रश्नावर उत्तर देताना दादाजी भुसे यांनी म्हटलं की, या मागणीला कृषिमंत्री म्हणून आपले समर्थन असून मी शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसंच उर्जाविभागाचे लवकरच नवीन धोरण घोषित केल जाईल. या नवीन धोरणाचे प्रारूप सध्या तयार होत आहे. त्यामुळे या महिन्यात हे नवीन धोरण येईल, असंही कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले.
संपादन - अक्षय शितोळे
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.