संतापाच्या भरात पेटवून घेतलेल्या आईचा मृत्यू, मुलगी ठरली कारण

संतापाच्या भरात पेटवून घेतलेल्या आईचा मृत्यू, मुलगी ठरली कारण

काल या महिलेनं नाशिकमधील पंचवटी पोलीस स्थानकात स्वत:ला पेटवून घेतलं होतं

  • Share this:

नाशिक, 11 फेब्रुवारी : कौटुंबिक वादातून काल नाशिक येथील महिलेनं स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. आज या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हरजितकौर संधू (वय 45) असं या महिलेचं नाव आहे. मुलगी आणि आईमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. यामुळे आई-वडिलांविरोधातच तक्रार करण्यासाठी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. यावर संतापलेल्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं होतं. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटवरच ही घटना घडली होती. महिलेला लागलीच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र ही महिला 75 टक्के भाजली होती. आज या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी सासरी ही नांदत नसल्यानं आणि माहेरीही येत नसल्यानं संतापाच्या भरात आईनं स्वतःला पेटवून घेतल्याचे म्हटले जात आहे. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुलींच्या लग्नामुळे होते अस्वस्थ; वडील, आई आणि भावाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन!

गडचिरोली शहरात आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील),  वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एकला  वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.

 

First published: February 11, 2020, 8:58 AM IST

ताज्या बातम्या