पुणे तिथे काय उणे.. कोंबडा भल्या पहाटे आरवतो, झोपमोड होते म्हणून पोलिसांत तक्रार

पुणे तिथे काय उणे.. कोंबडा भल्या पहाटे आरवतो, झोपमोड होते म्हणून पोलिसांत तक्रार

कोंबडा भल्या पहाटे आरवतो म्हणून झोपमोड होते, अशी तक्रार एका महिलेने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. तक्रार निनावी असल्याने तक्ररदार महिला कोण, हे समजू शकले नाही.

  • Share this:

पुणे, 25 मे-पुणे तिथे काय उणे.. किंवा हे फक्त पुण्यातच होऊ शकतं,  असं म्हटले जाते. काही महिन्यांपूर्वी आमच्या मांजरीना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण त्रास देतात, अशी तक्रार त्यांच्या शेजारी राहणाऱ्याने एका महिलेने दिली होती. घाण करतात. म्हणून शेजाऱ्याने पोलिसांत तक्रार केली होती. आती तशीच घटना समोर आली आहे.

कोंबडा भल्या पहाटे आरवतो म्हणून झोपमोड होते, अशी तक्रार एका महिलेने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. तक्रार निनावी असल्याने तक्ररदार महिला कोण, हे समजू शकले नाही. आता पुणे पोलीस याप्रकरणी काय पाऊल उचलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले पोलीस?

कोंबडा जेरबंद केला तरी सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक विचित्र घटना समोर आली होती. एकाचा कुत्रा खूप आजारी होता. तो आजारातून बरा झाला म्हणून खंडोबाला नवस पूर्ण करून जागरण गोंधळ घातला होता. त्यामुळं प्राणी प्रेम आणि प्राणी राग अशा टोकाच्या प्रतिक्रिया पुणेकरांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

गाढव खाऊ घातला भाजीपाला

काही महिन्यांपूर्वी एक गाढव जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. प्राणीप्रेमी रेक्यु संस्थेने गाढवावर उपचार केले. त्याला भाजीपाला खाऊ घातला. विशेष म्हणजे भाजीपाला खाल्ल्यानंतर गाढव आनंदाने गाऊ लागले होता. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

काय आहे वंदना चव्हाण यांचा मांजरीवरून वाद...

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे शेजारी राहणाऱ्या महिलेशी मांजरीच्या कारणावरून पुन्हा भांडण झाल्याचा प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आला होता. मांजरीवरून झालेल्या भांडणाचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. खासदार चव्हाण यांनी शेजारीण मेधा नावडीकर यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली होती.

खासदार चव्हाण आणि नावडीकर या रामबाग कॉलनीतील यशोधन अपार्टमेंटमध्ये राहतात. खासदार चव्हाण या त्यांच्या फ्लॅटमधील किचनमध्ये स्वयंपाक करत असताना नावडीकर या दोन मांजरींना किचन रूमच्या खिडकीसमोर घेऊन आल्या. चव्हाण यांनी त्यांना 'तुझ्या मांजरींना किचनजवळ घेऊन येऊ नकोस, त्या घरात येऊन नासधूस करतात', असे सांगितले. त्यावर संतापलेल्या नावडीकर यांनी जोरात ओरडून ‘ए, तू दुसरीकडे जाऊन राहा’ असे सुनावले. चव्हाण यांनी तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नावडीकर या काहीही ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे चव्हाण यांनी नावडीकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यापूर्वीही चव्हाण आणि नावडीकर यांच्यात मांजरीवरून वाद झाला होता. दरम्यान, नावडीकर यांच्याकडे जवळपास 50 पाळीव मांजरी असल्याची माहिती आहे.

पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 25, 2019, 4:52 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading