औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल

औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 15 जून- वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे. शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना आता चिरडावे लागेल. याची सुरुवात बेगमपुरा भागातून करावी लागेल, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य जलील केले होते. तसेच बेगमपुरा भागात अफसर खान यांचा पत्त्याचा क्लब चालतो. तो मी बंद करणारच, असेही खासदार जलील यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. खासदार जलील यांच्या याच भाषणाचा आधार घेत नगरसेवक अफसर खान यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. 'माझ्या जीवास काही झाले तर इम्तियाज जलील जबाबदार राहतील.', असे अफसर खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. एमआयएमचे काम केले नाही म्हणून मला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही अफसर खान यांनी केला आहे.

हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं

खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडा, यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात धुडगूस घालत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या गोंधळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून एमआयएमवर हल्लाबोल केला आहे. 'लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्यावरुन वाद...

वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी विरोध केला होता. त्यावरुन एमआयएम नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ केला. एवढेच नाही तर एमआयएम नगरसेवकाकडून राजदंडही पळवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एमआयएमच्या 20 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.

महापालिकेत सभा सुरु होताच भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. एमआयएम नगसेवकांनी खा.जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्याकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले होते. एमआयएमचे नगरसेवक सभापतींच्या आसनासमोर ठाण मांडून बसले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन केल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाहीत, असे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले होते. महापौर सत्तेची दुरुपयोग करत असून जातीवाद करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

मेट्रो ट्रेनमध्ये हँडलला प्रवासी लटकले, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

First published: June 15, 2019, 10:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading