Home /News /maharashtra /

तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढणार? पोलिसात तक्रार दाखल

तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढणार? पोलिसात तक्रार दाखल

शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

तुकाराम मुंढे आणखी एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. कारण मुंढे यांच्याविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नागपूर, 8 जून : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे अनेकदा चर्चेत आले आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे त्यांच्यावर काही जणांकडून टीका झाली. अशातच आता तुकाराम मुंढे आणखी एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. कारण मुंढे यांच्याविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनाला शासनाने बंदी घातली असताना सुमारे 200 लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकाने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे. मनीष मेश्राम रा.सिरसपेठ असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्यांनी एका व्हिडिओ या तक्रारीत दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात 31 मे 2020 ला आयोजित कार्यक्रमात 200 लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. हेही वाचा - पुण्यात नव्या आदेशानुसार हे राहणार सुरू आणि बंद ; संपूर्ण यादी या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे.त्यामुळे हॉटेल राजवाडा , असो की कार्यक्रमाला परमिशन देणारे अधिकारी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक , त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनीष मेश्राम यांनी तक्रारीतून केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Tukaram mundhe

पुढील बातम्या