मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /2 कोटींच्या लाच प्रकरणातील फिर्यादीच निघाला खुनी; पोलिसांनी उलगडलं मित्राच्या हत्येचं गूढ

2 कोटींच्या लाच प्रकरणातील फिर्यादीच निघाला खुनी; पोलिसांनी उलगडलं मित्राच्या हत्येचं गूढ

गेल्यावर्षी आरोपी राहुल कासट यानं आपला मित्र सुरेश करवा याचा खून केला होता. (फोटो-लोकमत)

गेल्यावर्षी आरोपी राहुल कासट यानं आपला मित्र सुरेश करवा याचा खून केला होता. (फोटो-लोकमत)

Murder in Parbhani: गेल्या वर्षी सुलू येथे झालेल्या एका अपघात प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

परभणी, 14 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सुलू (Sulu) येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याला 2 कोटी रुपये लाच (Rs 2 Crore Bribe Case)मागितल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणातील फिर्यादीच आपल्या मित्राचा खुनी (Friend's Murderer) निघाला आहे. आरोपीनं अनैतिक संबंधातून आपल्या मित्राची हत्या केली करून अपघात झाल्याचा  बनाव (Plot as Accident) रचला होता. याप्रकरणी सुलू पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक (5 Accused Arrested) केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्यावर्षी आरोपी राहुल कासट यानं अनैतिक संबंधातून आपला मित्र सुरेश करवा याचा खून केला होता. यानंतर आरोपीनं सुरेशचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडीओ क्लिप समोर आली होती. या व्हिडीओ समोर आल्यानंतर, संबंधित अपघाताचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांनी कारवाई टाळण्यासाठी राहुल कासटकडे 2 कोटी रुपयांची लाच मागितली. पण आरोपी कासटनं याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागानं कारवाई करत दोन्ही पोलिसांना रंगेहाथ अटक केली होती.

हेही वाचा-बापरे! आजीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून आरामात राहत होता नातू

या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, 2 कोटींच्या लास प्रकरणातील फिर्यादी राहुल कासट हा आपला मित्र सुरेश करवा यांच्या अपघात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. मयतचा भाऊ सतीश करवा यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणात पोलिसांनी 1 ऑगस्ट रोजी जितेंद्र भरतसिंग ठाकूर याला अटक केली होती. राहुल कासटनंच सुरेशची हत्या करून तो  अपघात असल्याचा बनाव रचल्याची कबुली सह आरोपी ठाकूरनं दिली आहे.

हेही वाचा-बस प्रवासात 5 महिलांनी अडीच लाखांवर मारला डल्ला; वाहकाच्या सतर्कतेमुळं चोरी उघड

आरोपी कासटनं त्याच्याकडे काम करणारा हमाल विनोद अंभोरे आणि विशाल पाटोळे यांना सुरेशच्या हत्येची सुपारी दिली होती. कासटच्या सांगण्यावरून अंभोरे यानं शहरातील एक चारचाकी वाहन भाड्यानं घेत, वाहनचालक राजेभाऊ खंडागळे यालाही कटात सामील करून घेतलं. यानंतर वाहनचालक आरोपी खंडागळे यानं सुरेश यांच्या दुचाकीला अपघात घडवून त्यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर आरोपी विनोद अंभोरे आणि विशाल पाटोळे त्याठिकाणी आले त्यांनी करवा यांच्या पाठीत दगड घालून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Parbhani