महाशिवआघाडीवर नवं ट्वीस्ट: काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द

महाशिवआघाडीवर नवं ट्वीस्ट: काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द

शिवसेना पक्षाबरोबर आघाडी सत्तास्थापन करत असताना मिनिमम कॉमन प्रोग्राम यात कोणते विषय असावेत यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही सगळ्यात महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतली बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. बैठक रद्द झाली असून ती पुन्हा कधी होईल हे माहित नाही पण मी बारामतील जात असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.  ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही बिनसलं का अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

शिवसेना पक्षाबरोबर आघाडी  सत्तास्थापन करत असताना मिनिमम कॉमन प्रोग्राम यात कोणते विषय असावेत यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही सगळ्यात महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. चर्चा न करताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक रद्द करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यासह काही नेते तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांसह काही काँग्रेसचे नेते सहभागी होणार होते.

बैठक रद्द झाल्याविषयी विचारलं असता आमच्यात आणि राष्ट्रवादीत अद्याप चर्चा झालेली नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अद्याप आम्हाला राष्ट्रवादीकडून बैठकीचा निरोप आलेला नाही असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. त्यामुळे कोणत्या कारणामुळे बैठक रद्द करण्यात आली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सत्ता कोंडीच्या या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अखेर छुपी तोडली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही तयार होतो पण शिवसेनेनं नकार दिला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी - महाराष्ट्राच्या सत्ता कोंडीवर अमित शहांचं विधान, आम्ही विश्वासघात केला नाही तर..

राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे. जर भाजप आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं पंतप्रधान आणि मी काय म्हणत आलो. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता मात्र त्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे अशा शब्दात अमित शहा यांनी शिवसेनेनं केलेला आरोप फेटाळला आहे.

शिवसेनेची ही मागणी मान्य नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. ANI या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, 'राज्यपालांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. त्यांनी प्रत्येकाला समान वेळ दिला. महाराष्ट्रात 18 दिवस राज्यपालांनी वेळ दिली. विधानसेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी पक्षांना निमंत्रण दिलं. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ दिला. सर्व पक्षांना पुरेसा वेळ देण्यात आला. ज्यांना सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्याकडे आजही वेळ आहे' असं अमित शहा म्हणाले आहेत.

इतर बातम्या- शिवसेनेचं ठरलं, या तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

शिवसेनेचं ठरलं, या तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. आणि येत्या 17 नोव्हेंबरला शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याच दिवशी शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्या दृष्टीने शिवसेना तयारीत असल्याचीही माहिती आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्यादिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं मी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिलं आहे असं उद्धव ठाकरे सतत म्हणत असतात. त्यामुळे 17 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असं असताना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी बैठक रद्द झाल्यामुळे राजकीय सत्ता कोंडीचा गोंधळ वाढल्याची चर्चा आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 13, 2019, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading