'मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा की, माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का? अधोगती आहे कळत नाही? मुंब्य्राचं नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, या सकाळी लवकर उठून मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असा आव्हानच आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं. 'जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत, तटकरे लोकसभेत खासदार आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचा आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात आणला. तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का राज ठाकरे साहेब, दलित विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्यांना कसं मारलं गेलं होतं, तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का तुम्हाला? असा सवालच आव्हाडांनी राज ठाकरेंना केला. (VIDEO : 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला घोडा; कारण जाणून व्हाल भावुक) राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही, की जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सभेला लाखो लोक जायचे, पण प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही झाले. भाषणाला लोक गेली तर तो फार मोठा, अगडताड,लोकप्रिय, मास लीडर, असं काही नसतं. जनतेत जावं लागतं शेवटच्या घटकापर्यंत जावं लागतं त्यासाठी आपली जात विसरावी लागते, शेवटच्या माणसाला ही तो आपलासा वाटावा लागतो, असं वातावरण निर्माण करावं लागतं, असा सल्लावजा टोलाही आव्हाडांनी लगावला. (उल्कापिंड की चीनी सॅटेलाईट? महाराष्ट्रात दिसलेला रहस्यमयी आगीचा गोळा नेमका कसला) जेम्स लेनने माँ साहेबांबद्दल जे काही लिहिलेलं आहे, ज्यांचा शिवरायावर आणि मराठी मातीवर प्रेम असेल तर त्या जेम्स लेनला उभ्या आयुष्यात माफ करणार नाही, जे काही माँ साहेबांचे बदनामी त्या पुस्तकात झालेली आहे ती अक्षम्य आहे. या जेम्स लेनला कोणी काय सांगितलं, जेम्स लेन हा भारतात जन्मलेला नाही, त्यांनी ऐकून वाचून पुस्तक लिहिलं, या पुस्तकावर नंतर लोकांनी पीएचडी केली असती, ती आम्ही स्वतःच पुस्तक थांबवलं असतं, सगळ्यांना पत्र लिहावं लागेल की, आमचा आणि जेम्स लेनच काही नात नाही. महाराष्ट्राच्या मातीला माहीत आहे, जेम्स लेनचे जन्मदाता कोण होते? आता ते आपल्यात नाहीत त्यामुळे त्यांचं नाव घेणे चुकीच आहे, त्यांच्यावरती काही बोलणंही चुकीच आहे. जेम्स लेन आला कुठून, जे महाराष्ट्रात शिवरायांचा इतिहास जाणतात शिवरायांचा प्रवास जाणतात, त्यांना व्यवस्थित माहीत आहे, हा महाराष्ट्रयीन जेम्स लिन कुठल्या पेठेतून बाहेर आला? असं म्हणत आव्हाडांनी बाळासाहेब पुरंदरे यांचं नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला.राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की,त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे.दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात मुंब्र्याला बदनाम करू नका
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.