सोलापूरच्या शिक्षकाला सलाम! विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वापरला 'मोदींचा फॉर्म्युला'

सोलापूरच्या शिक्षकाला सलाम! विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वापरला 'मोदींचा फॉर्म्युला'

कोरोनाशी दोन हात! Work at home करणाऱ्या प्राध्यापकांनी Facebook Live वरून विद्यार्थ्यांना शिकवलं

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातलं आहे. जगभरात 100 हून अधिक देशांत कोरोना वेगानं पसरत आहे. भारतातही आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात 190 हून अधिक नागरिकांना तर महाराष्ट्रात 50 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सर्व कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना work at home करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात work at home अभियान राबविले जात असताना त्यात शिक्षकही मागे नाहीत हे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा वापर जास्त करतात. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. यासोबत ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या मोहिमा करत असतात. त्यांचाच आदर्श घेऊन डिजिटल मीडियाचा योग्य वापर करत या प्राध्यापकाने अनोखा उपक्रम राबवला आहे.

सोलापूर विद्यापीठातील कॉमर्स विभागाच्या तरुण प्राध्यापकांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या विध्यार्थयाना धडे शिकवण्यास सुरुवात केली. अश्या पध्दतीने डिजिटल माध्यमातून विध्यार्थयाना धडे दिले पाहिजेत अशी भावना पालक व्यक्त करत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं योग्य ते निरसन व्हावं हा त्यामागचा हेतू आहे. 31 मार्च पर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा प्रश्न सर्वांसमोर होता मात्र या प्राध्यापकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं आहे.

या संकल्पनेला उत्फूर्त प्रतिसाद देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना घरातून शिक्षणाचे धडे दिले आहेत. facebook live च्या माध्यमातून या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. त्यामुळे त्यांचं पालक आणि सोशल मीडियावर युझर्सनी भरभरून कौतुक केलं. कोरोना विषाणूचं संकट जगावर आलं असून त्याच्यासोबत दोन हात करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे .या विषाणूचा प्रसार आटोक्यात यावा यासाठी शासनाने work at home मोहीम राबवली. अश्यात जो तो आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भारतात (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला झाला आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 196 वर पोहोचली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये 69 वर्षांची इटालियन पर्यटक महिला भारतात आली होती. तपासणीत तिला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता 196 वर पोहोचली आहे. त्यापैकी 13 जणांवरील उपचार यशस्वी ठरलेत. हे 13 जण व्हायरसमुक्त झालेत. देशात कोरोनाव्हायरचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली.

First published: March 20, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या