कॉलेज व्यवस्थापकाच्या मुलाने केला बलात्काराचा प्रयत्न, शिक्षिकेने विष पिऊन केला शेवट

कॉलेज व्यवस्थापकाच्या मुलाने केला बलात्काराचा प्रयत्न, शिक्षिकेने विष पिऊन केला शेवट

या प्रकरणामुळे शिक्षिका मानसिकदृष्ट्या खूप खचली होती...ती सतत रडत होती...

  • Share this:

महाराजगंज, 25 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील नौतनवा ठाणे परिसरात विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निराश झालेल्या एका महिला शिक्षिकेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शिक्षिकेने विष प्राशन केल्यानंतर तिला गोरखपूर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

महिला शिक्षिकेच्या वडिलांनी एका खासगी कॉलेजच्या व्यवस्थापकांचा मुलगा आणि एका अन्य शिक्षकावर सामूहिक दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ठाणे परिसरातील एका गावात तरुणीने गुरुवारी विष प्राशन केले होते. यानंतर तातडीने तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. जेथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गावातील एका खासगी कॉलेजच्या व्यवस्थापकाचा मुलगा आणि एका शिक्षकाविरोधात दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे.

महिला इंटर कॉलेजमध्ये शिक्षिका होती. नेहमीप्रमाणे गुरुवारीही ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेली होती. घरी आल्यानंतर मात्र ती बदलली होती. ती खूप रडत असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुलीने कॉलेज व्यवस्थापकांचा मुलगा आणि एका शिक्षिकेने छेडछाड आणि निवस्त्र केल्याबद्दल  सांगितले. कशीबशी स्वत:ला वाचवत ती घरी पोहोचली. मात्र कॉलेजमधील या प्रकरणामुळे तिच्यावर खोलवर परिणाम झाला होता. त्यामुळे तिने विष प्राशन केले, असा आरोप शिक्षिकेच्या वडिलांनी केला आहे.

गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये सोडला जीव

विष खाल्ल्याने कुटुंबीयांनी तरुणीला जवळील रुग्णालयात दाखल केले. येथे पीडितेची गंभीर हालत बघून डॉक्टरांनी तिला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. येथे उपचारादरम्य़ान तिचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर कारवाई

पोलीस अधिक्षक रोहित सिंह सजवान यांनी सांगितले, की मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीचा मृत्यू झाला. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यानंतर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

First published: February 25, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या