भर रस्त्यात छेड काढणाऱ्या रोडरोमियोला तरुणींने दिला चोप

भर रस्त्यात छेड काढणाऱ्या रोडरोमियोला तरुणींने दिला चोप

पोलिसांनी योगेशला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे

  • Share this:

10 जून : गेल्या सहा महिन्यांपासून काॅलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची छेड कडणाऱ्या रोडरोमीयोला तरुणींनी चोप दिला. योगेश पगार असं विवाहीत तरूणाचं नाव आहे. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे

तालुक्यातील काकासाहेब नगर भागात छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज असून त्यात ग्रामीण भागातील अनेक तरुणी शिकायला येतात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून योगेश या विद्यार्थिनींची छेड काढायचा. अखेर या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनींनी धडस करून या रोडरोमीयोला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. कॉलेज सुटल्यानंतर छेड काढत असताना  5 ते 6 मुलींनी योगेशला परडून भररस्त्यात चांगलाच चोप दिला. या कामासाठी या मुलींना कॉलेज परिसरातील तरुण मुलं, कॉलेज शिक्षक व त्यांच्या पालकांनी मदत केली.

दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2017 09:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading