10 वर्षे जुनी इमारत पडूच कशी शकते? महाडमध्ये 200 जणांचा जीव धोक्यात येण्यामागे ही आहेत कारणं

10 वर्षे जुनी इमारत पडूच कशी शकते? महाडमध्ये 200 जणांचा जीव धोक्यात येण्यामागे ही आहेत कारणं

या इमारत दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा व्यवस्थेचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

  • Share this:

महाड, 24 ऑगस्ट : आधीच राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून (Mahad Building Collapsed) मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीमध्ये 60 पेक्षा अधिक फ्लॅट होते, अशी माहिती समोर आली आहे. तसंच काही कुटुंब यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या इमारतीचा काही भाग कोसळत होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं या घटनेनंतर समोर येत आहे. या इमारतीच्या बांधकामाला केवळ 10 ते 15 वर्षे झाली होती. त्यामुळे अवघे 10 ते 15 वर्षे जुनी इमारत पडूच कशी शकते असा सवाल उपस्थित झाला आहे. या इमारत कोसळल्यानंतर तब्बल 200 जणं ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम येथे दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

कोसळलेल्या या इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर नियंत्रण रेषेत तळ्याच्या शेजारीच ही इमारत बांधण्यात आली होती. प्रवीण दरेकर महाडच्या दुर्घटना स्थळी रवाना झाले असून राज्यतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, इमारत केवळ 10 ते 15 वर्षे जुनी आहे. त्यामुळे पावसामुळे इमारत कोसळल्याचे सांगू शकत नाही. या इमारतीत 200 जणं राहत होते, त्यापैकी 10 ते 15 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. तीन एनडीआरएफची टीम पुण्याहून येत आहे, लोकल सह्याद्रीची रेस्क्यू टीम येथे पोहोचली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 8:34 PM IST
Tags: mahad

ताज्या बातम्या