धक्कादायक! विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या

धक्कादायक! विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या

सतत होणारी छेडछाड आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं प्राजक्तानं प्राशन केलं शेतात फवारण्यात येणार तणनाशक

  • Share this:

कोल्हापूर, 31 ऑक्टोबर: गावातील तरुणांकडून वारंवार होणार विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं महाविद्यालयीन तरुणीनं तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

तरुणीच्या आत्महत्येनंतर संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे नणुंद्रे गावात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा..उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं अयोग्य, संजय राऊतांचा टोला

मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी प्रतीक पाटील, अजित पाटील आणि अक्षय चव्हाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय-20) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी सर्पदंशानं निधन झालं होतं. ती गावात आईसोबत राहत होती. अल्पभूधारक असल्यानं दोन्ही मायलेकी किराणा दुकानावर आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र, प्राजक्ताची गावातील तीन तरुण कायम छेड काढत होते. एवढंच नाही तर तिच्या मोबाईलवर फोन करून तसेच मेसेज पाठवून तिला त्रास देत होते.

सतत होणारी छेडछाड आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं प्राजक्तानं 23 ऑक्टोबरला शेतात फवारण्यात येणार तणनाशक प्राशन केलं होतं. उपचार सुरू असताना प्राजक्ताचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर नणुंद्रे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावानं संशयित आरोपींच्या घरांवर हल्ला केला. घरात घुसून नासधूस केली केली. या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा...भावाने घेतला सख्ख्या भावाचा बदला, पत्नीसोबत अवैध संबंध ठेवल्यानं काढला काटा

मृत तरुणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रार दाखल झालेल्या संशयित आरोपी अजित पाटील या तरुणानं घाबरून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading