मुंबई, 13 फेब्रुवारी : राज्यात तापमानामध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. रात्री थंडी जाणवते तर दिवसा प्रचंड उन्हाचा तडाखा बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे 32 ते 34 अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरम्यान, उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने वातावरण बदलामुळे महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरला आहे.
महाराष्ट्रातील पारा घसरला -
उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरला आहे. निफाडमध्ये नीचांकी 5.5 अंशांची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतात 8 ते 10 फेब्रुवारीदरम्यान पश्चिमी चक्रवात आले होते. त्यामुळे बफर्वृष्टी आणि पावसाने वातावरणात बदल झाला आहे.
कोणत्या राज्यात झाला बदल -
उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे बफर्वृष्टी आणि पावसाने वातावरणात बदल झाला आहे. याचा परिणाम पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये किमान तापमानात घसरण झाली आहे. तसेच सकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे.
हेही वाचा - IIT Bombay : एकटेपणाला कंटाळला? सातव्या मजल्यावरुन उडी घेत मुंबईत IIT च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
महाराष्ट्रातील निफाड येथे रविवारी नीचांकी 5.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात तीन दिवसांपासून किमान तापमानात घसरण होत आहे. तर रविवारी बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 अंशांपर्यंत नोंदवण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Todays Weather, Weather, Weather Forecast, Weather Update