राज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी

राज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी

राज्यातल्या अनेक भागात आता थंडीचा कडाका. परभणीत 9.2 तर महाबळेश्र्वरमध्ये 16 अंश सेल्सियसची नोंद.

  • Share this:

परभणी, 14 नोव्हेंबर : राज्यातल्या अनेक भागात आता थंडीचा कडाका जाणवू लागलाय. गेल्या चार दिवसांपासून परभणीचं तापमान 10 अंशाखाली घसरलं असून, अनेक ठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरूवात झालीय. यंदा झालेल्या अल्प पावसामुळे राज्याच बहुतांश ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असली तरी, घसरत्या पाऱ्यामुळे परभणीसह राज्याच्या इतर दुष्काळी भागांवर धुक्याची चादर पहावयास मिळत आहे. उल्लेखनीय बाब अशी की, बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात भरभणीत 9.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली, जी राज्यातल्या मिनी काश्मिरपेक्षा 6.8 अंशाने कमी होती. महाबळेश्वर तापमान 16 अंश सेल्सियस नोंदवल्या गेलंय.

राज्यात यंदा झालेल्या अल्प पावसामुळे बहुतेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळा केवळ नावालाच गेला असला तरी आता राज्यात हळूहळू थंडीची चादर पांघरायला सुरूवात झालीय. मुंबई आणि कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा जोर वाढीस लागला असून, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोदं परभणी येथे करण्यात आली. परभणीचा पारा 9.2 अंशापर्यंत खाली आलाय. तर सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदवल्या गेलंय.

बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात मुंबईचं तापमान 20.4 अंश सेल्सियस नोंदवल्या गेलंय. त्या खालोखाल महाबळेश्वरमध्ये 16 अंश सेल्सियस तापमान नोंदवल्या गेलंय. सांगली, वर्धा आणि औरंगाबादेत प्रत्येकी 13 अंश सेल्सियस तापमानाची नोद झाली असून, नागपूर आणि जळवात प्रत्येकी 12 अंश सेल्सियस तापमान नोंदवल्या गेलंय. तर नाशिकचा पारा 10 अंशावर स्थिरावल्याची नोंद झालीय. विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटे तापमान 12 ते 14 अंशांच्या घरात असतं. या आठवड्यात अशीच थंडी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

परभणीचं तापमान सलग 4 थ्या दिवशी 10 च्या खाली असून, कडाक्याच्या थंडीमुळे अबालवृद्ध उबदार कपडे घालून बाहेर पडाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण आणी शहरी भागात आता शेकोट्या पटायला सुरुवात झालीय. यंदा पाण्याची कमतरता असल्याने या दुष्कळी पट्ट्यावर आज छान अशी धुक्याची चादर पाहायला मिळली.

मुंबई - 20.4

महाबळेश्वर - 16

परभणी - 9.2

जळगाव - 12

नशिक - 10

सांगली -13

औरंगाबाद - 13

नागपूर - 12

वर्धा -13

 VIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ

First published: November 14, 2018, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading