• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • परभणी, नगर गारठलं; मुंबईकरांना मात्र थंडीची अजून वाट पाहावी लागणार

परभणी, नगर गारठलं; मुंबईकरांना मात्र थंडीची अजून वाट पाहावी लागणार

विदर्भ, मराठवाडा गारठला असला, तरी मुंबईत मात्र अजूनही थंडीची प्रतीक्षा आहे. यंदा थंडी एवढी का रुसली आहे? हवामान खातं काय म्हणतंय पाहा

 • Share this:
  मुंबई, 28 नोव्हेंबर : होय.. दादा कोंडकेंवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यानं सध्या राज्यातल्या ग्रामीण भागावर चांगलीच भुरळ पाडली आहे. शहरी भागापासून अलिप्त असलेला राज्यातल्या ग्रामीण भागात दिवस कलंडताच कमालिची थंडी पडते. मग हव्याहव्याशा वाटणाऱ्या या थंडीत जागोजागी शेकोट्या पेटतात आणि आपसूक ओठावर येतं ''आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा..'' हे गाणं. मुंबई वगळता राज्यात सद्या सर्वत्र थंडीचा जोर वाढला आहे. येत्या आठ दिवसात थंडीचा जोर असाच कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय. रात्री प्रमाणेच दिवसाच्या तापमानात सुद्धा घट होण्याची शक्या हवामान खात्यानं वर्तवलीय. गेल्या 48 तासात राज्यात परभणी आणि अहमदनगरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. परभणी जिल्ह्याचा पारा 9.5 अंशापर्यत खाली आला, तर अहमदनगरचा पारा 10.0 अंशापर्यंत खाली आला. आश्चर्याची बाब अशी की, राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही हे दोन्ही जिल्हे यंदा चांगलेच गारठले आहेत. गेल्या 48 तासात महाबळेश्वरचं तापमान फक्त 1 टक्क्याने कमी झालंय, जे बुधवारी 14.6 एवढे नोंदवल्या गेलं. राज्यात आणखी दमदार थंडीची प्रतीक्षा राज्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, येत्या आठ दिवसात तो असाच कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि गोव्यात थंडीचा जोर वाढता असला तरी, मुंबईकरांना मात्र थंडीची आणखी वाट पहावी लागणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. केरळ आणि बंगालच्या उपसागरात उठलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही काळ थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 24 तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात आज हवामान कोरडं होतं. विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट झाली होती. तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात तापमानात किंचीत घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात तापमानात सरासरीच्या तलुनेत काहीप्रमाणात वाढ झाली. तर, उरलेल्या राज्यात तापमान सरासरी इतकं होतं. प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं किमान तापमान... मुंबई (कुलाबा) २३.५, सांताक्रूझ १९.६, अलिबाग २०.०, रत्नागिरी १९.०, पणजी (गोवा) २१.२, डहाणू २०.५, अहमदनगर १०.०, जळगाव १५.०, कोल्हापरू १६.८, महाबळेश्वर १४.६, मालेगाव १४.८, नाशिक ११.६, सांगली १३.३, सातारा १२.९, सोलापूर १७.५, उस्मानाबाद आणि औरंगाबाद १०.६, नांदेड १५.०, अकोला १३.३, अमरावती १४.२, बुलढाणा १५.४, ब्रह्मपुरी १२.७, गोंदिया १३.५, नागपूर ११.३, यवतमाळ १२.४. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १०.० अं. से. नोंदवले गेले.  VIDEO: कष्टाने पिकवलेला टोमॅटो घसरल्याने बळीराजा नाराज, उचललं हे मोठं पाऊल
  First published: