राज्यावर धुक्याची चादर; ग्रामीण भागात पेटताहेत शेकोट्या

राज्यावर धुक्याची चादर; ग्रामीण भागात पेटताहेत शेकोट्या

किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागात रात्रीला आणि शुक्रवारी पहाटे धुक्याची चादर पांघरल्या गेली असल्याचं पहावयास मिळालं.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागात रात्रीला आणि शुक्रवारी पहाटे धुक्याची चादर पांघरल्या गेली असल्याचं पहावयास मिळालं. तर दाट धुक्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावर वाहनधारकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. रविवारपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागांत धुक्याची चादर परसली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. वाढलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मध्य महाराष्ट्रातील नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घट होऊन 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

जळगाव, मालेगाव, नाशिक, सातारा, सांगली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणचा पारासुद्धा शुक्रवारी 10 अंशाच्या खाली आला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सायंकाळ होताच ग्रामीण भागात शेकोट्या पेटत असल्याचं पहावयास मिळत आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. धुक्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे उत्तरेकडून राज्यात पोहोचणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकारवसुद्धा परिणाम झाला असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 19.8

मुंबई (सांताक्रूज) 16.0

रत्नागिरी 18.6

पणजी (गोवा) 21.0

पुणे 11.2

अहमदनगर 6.5

जळगाव 8.6

कोल्हापूर 16.6

महाबळेश्वर 13.0

मालेगाव 9.8

सांगली 13.8

सातारा 13.3

सोलापूर 16.0

उस्मानाबाद 14.0

औरंगाबाद 10.0

परभणी 11.5

नागपूर 8.3

अकोला 11.0

अमरावती 11.8

बुलडाणा 11.4

ब्रम्हपूरी 10.0

चंद्रपूर 10.6

गोंदिया 10.2

वर्धा 11.0

यवतमाळ 8.4

VIDEO : एका ठिणगीने शेतातला 30 एकर ऊस जळून खाक!

First published: December 21, 2018, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading