मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देश गारठला! राजस्थानमध्ये पारा शून्याच्या खाली, वाचा 24 तासात महाराष्ट्रात कशी असेल स्थिती

देश गारठला! राजस्थानमध्ये पारा शून्याच्या खाली, वाचा 24 तासात महाराष्ट्रात कशी असेल स्थिती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रतही मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 डिसेंबर : उत्तर-पश्चिम भारतातील थंडीची लाट बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. मध्य प्रदेशात थंडीची लाट आणि कडाक्याची थंडी पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितलं की, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट (Cold Wave) आणि तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम राहील आणि त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रतही मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट (Cold Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे.

तीव्र थंडीची लाट महाराष्ट्राच्या सीमेवर, राज्यातही घसरला पारा, कसं असेल हवामान?

"पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे,"असं IMD ने म्हटलं आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही लाट कमी होण्याची उच्च शक्यता आहे.

22 ते 25 डिसेंबर या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. 24 डिसेंबरला पंजाबमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये आणि पश्चिम राजस्थानमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

12 हजार फूट उंचीवर आणि -20 डिग्री तापमानात खेळलं जातंय आइस हॉकी, पाहा PHOTOS

राजस्थानच्या बहुतांश भागात थंडी असून चुरू आणि सीकरसह अनेक ठिकाणी किमान तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात आहे. फतेहपूरमध्ये रविवारी रात्रीचे किमान तापमान उणे १.८ अंश सेल्सिअस होते. त्याचप्रमाणे करौली येथे (-) ०.१ अंश सेल्सिअस, सीकर आणि चुरू (-) ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

First published:

Tags: Weather forecast, Weather update